Pune News : अजित पवारांचा चेहरा उघडा झाला, पेट्रोल डिझेलचा पैशावर त्यांना राज्य चालवायचे : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : राज्याने त्यांचा टॅक्स कमी केला तर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील असे आम्ही वारंवार सांगत होतो. परंतु आता अजित पवारांचा खरा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल आणि डिझेल मधून मिळणाऱ्या टॅक्सवर राज्य चालवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी पेट्रोल डिझेल तिच्या कक्षेत टाकण्यास विरोध केला आहे असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला. 

पेट्रोल आणि डिझेल जीएसटी च्या कक्षेत येण्याबाबत चर्चा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते. केंद्राला आपला कर लावण्याचा अधिकार आहे पण राज्याच्या घराच्या अधिकारावर गदा येता कामा नये.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत आम्ही आपली स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले होते. त्यांच्या या भक्त भरून राज्य सरकारचा याला विरोध असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, लखनऊ येथील जीएसटी परिषदेला अजित पवार का गेले नाहीत, पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी विरोध का हे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेनेच त्यांना विचारावे. पेट्रोल डिझेल जीएसटी च्या कक्षेत आलं तर 30 रुपयांनी किमती कमी होतील.

असं असतानाही अजित पवार याला विरोध का करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी विचारला पाहिजे. या निमित्ताने अजित पवार यांचा खरा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समधून चालणाऱ्या नगदी पैशावर सरकार चालवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी ह्याला विरोध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.