Nashik News : अजमेरवाला यांची 2800 कि.मी. सायकल प्रवासास सुरुवात

एमपीसी न्यूज : पर्यावरण जनजागृती साठी डॉ. मुस्तफा टोपीवाला ,युसुफ टोपीवाला व अब्दुल तय्यब अजमेरवाला यांची 2800कि.मी. सायकल प्रवासास सुरुवात झाली आहे. माझे पर्यावरण माझी जबाबदारी” हा संदेश घेऊन या तीन  सायकलिस्ट नी आज सायकल प्रवासास सुरुवात केली. या प्रवासादरम्यान ते जागोजागी रोपांचे  वाटप करणार आहेत व पर्यावरणाबद्दल जनजागृती करणार आहेत. 

नाशिक –  बऱ्हाणपूर – उज्जैन- अहमदाबाद -कच्छ (मांडवी)- जामनगर -सुरत मार्गे मुंबई असा 2800 कि.मी. सायकल प्रवास 8 दिवसात  करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या सायकल प्रवासा द्वारे ते कोरोना योध्यांना सलाम करणार आहेत. देशभरात डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेविका त्याचबरोबर पोलिस हे सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करत असतात अशा योध्यांना सायकल राइडद्वारे अनोखी सलामी करणार आहेत.

बोहरा समाजाचे प्रमुख धर्मगुरू सैय्दना मुफद्दल सैफुदिन यांचे आशिर्वाद घेऊन या प्रवासाला  कुतबी मज्जिद द्वारका येथून आज सकाळी साडेसहा वाजता हिरवा झेंडा दाखवून  सुरुवात करण्यात आली. यावेळी  नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र वानखेडे, सचिव डॉ. मनिषा रौंदळ,जेष्ठ  उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, कुतबी मर्चेट ,आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे उपस्थित होत्या. या सायकल प्रवासात विशेष सपोर्ट टीम मध्ये मुल्ला मुरताजभाई बु-हानी  ,मुफाद्दलभाई  मर्चंट, हुसेनभाई लाईटवाला ,मुफद्द्ल रशीद जनाब यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.