Akurdi : आकुर्डी, वाल्हेकरवाडी परिसरात गणरायाला निरोप

एमपीसी न्यूज – आकुर्डी, वाल्हेकरवाडी, रावेत परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी गणरायाला आज (शनिवारी) भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. पारंपरिक वाद्यांचा वापर, मिरवणुका काढण्यात आली.

गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. नवव्या दिवशी आकुर्डी, वाल्हेकरवाडी, रावेत, बिजलीनगर परिसरातील मंडळांनी गणरायाला निरोप दिला. चिंचवड गावातील पवना नदी तसेच रावेत येथील पवनानदी घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली होती. तसेच निर्माल्य कुंड आणि विविध सेवाभावी संस्थांनी मूर्तिदानही स्वीकारले.

वाल्हेकरवाडीतील रजनीगंधा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत काळभोरनगर येथील स्वराज्य ढोल ताशांचे पथक सहभागी झाले होते. तर, सोसायटीतील सदस्यांनी रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. तसेच मुक्तांगणच्या पथकाने रंगावली रेखाटली होती. त्यामध्ये मधुरा कुलकर्णी, अनिता रोकडे, स्वप्नाळी काळे यांनी सहभाग घेतला. मिरवणुकीत अध्यक्ष सागर चिंचवडे, यशराज चिंचवडे, सुजाता चिंचवडे, नाना चिंचवडे, दिलीप काकरे, संजय रवंदळ, प्रकाश चव्हाण, मारुती माळी, अनिल धनगर, बाळासाहेब माने, दशरथ सोनवणे, गोरोबा कोल्हे, सागर भापकर आदी सहभागी झाले होते. मिरवणूक वाल्हेकवाडीमार्गे रावेत घाटावर पोहोचली आणि गणरायाचे विसर्जन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.