मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune News : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या एकाच दिवशी पुण्यात तीन शाखा कार्यान्वयीत

एमपीसी न्यूज अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन शाखा पुर्णपणे कार्यान्वीत झाल्या आहेत.(Pune News)हा कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी पुण्यातील पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिका येथे पार पडला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत धडफळे, पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ केतकी कुलकर्णी, कार्याध्यक्ष सचिन टापरे, ब्रह्मोद्योग अध्यक्ष तेजस फाटक, ब्रह्मकेसरी प्रमुख राहुल साकतकर, शाखा अध्यक्ष डॉ अर्चना जोशी, शशांक शिरगांवकर आदी उपस्थित होते.

Chinchwad News : तरुणाला लिंक ओपन करणे पडले महागात, बसला अडीच लाखांचा गंडा

या शाखांमध्ये सहकारनगर व बिबवेवाडी शाखांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्रके देण्यात आली व कोंढव्या सारख्या भागात नवीन शाखा उदघाटनाची घोषणा देखील करण्यात आली.(Pune News) मागील दीड वर्षात महासंघाने गाठलेला हा 16 व्या शाखांचा पल्ला आहे. एकाच वेळी, एके ठिकाणी तीन शाखांची निर्मिती होणे हा एक वेगळा विक्रम महासंघाने केला आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटन प्रमुख सुनील शिरगांवकर यांनी केले होते.

Latest news
Related news