Akhtar on Ganguly : सौरव गांगुली उत्तम कर्णधार तर एम एस धोनी एक उत्तम लीडर – शोएब अख्तर

Sourav Ganguly is a great captain while MS Dhoni is a great leader - Shoaib Akhtar

एमपीसी न्यूज – रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शोएब अख्तरने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना भारतीय संघाचे सर्वेात्तम कर्णधार असल्याचे सांगितले आहे.

शोएब अख्तर हॅलो ॲपमधील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी तो म्हणाला की, भारताबाबत बोलायचे झाले तर सौरव गांगुली उत्तम कर्णधार आहे. त्यानंतर भारताला त्यांच्यासारखा उत्तम कर्णधार मिळाला नाही.

 धोनीसुद्धा उत्तम खेळाडू आणि कर्णधार आहे. एमएस धोनी एक उत्तम लीडर असल्याचंही शोएब अख्तरने यावेळी सांगितलं. परंतु, जेव्हा तुम्ही टीम तयार करता, त्यावेळी गांगुलीने उत्तम कामगिरी केली होती.

शोएब अख्तरने पुढे म्हणाला की, जेव्हा गांगुली कर्णधार पदावर आले तेव्हा क्रिकेट विश्वाचं आणि भारतीय संघाचं रूपडं पालटलं.

‘जेव्हा भारतीय संघ गांगुलीच्या नेतृत्तामध्ये 2004मध्ये पाकिस्तानमध्ये आला होता, तर मला वाटलं की, हा संघ पाकिस्तानला हरवू शकतो आणि तसंच झालं.’ भारताने कसोटी सामन्यात पाकिस्तानला हरवून 2-1 आणि 2004मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 3-2 ने हरवलं होत.

गांगुलीचे कौतुक करताना अख्तर म्हणाला कि, गांगुली हा धाडशी खेळाडू आहे. मी जेंव्हा त्याला चेंडू फेकत असे तेंव्हा त्याला माहित असायचे कि त्याच्याकडे पुरेसे शॉट्स नाहीत तरी सुद्धा त्याने कधी माघार न घेता, प्रत्येक चेंडूचा सामना केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.