Akluj : पाेलीस मित्र परिवार संघाचा वर्धपनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज -पोलीस मित्र परिवार संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या मुख्य शाखेच्या वतीने दुसरा वर्धापन दिन दि. 12 राेजी 12.30 वाजता अकलूज (ता. माळशिरस, जि. साेलापूर) येथे पंचवटी येथील मुख्य कार्यालयासमाेर साजरा करण्यात आला. पोलिस मित्र, सभासद आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.

यावेळी पोलीस मित्र परिवार संघाचे संस्थापक माननीय रमेश सुरवसे-पाटील, माधुरी सुरेश उदावंत, पुणे जिल्हा अध्यक्ष व महिला प्रकल्प अधिकारी व मान्यवर पुणे जिल्हा युवा अध्यक्ष महेश भोई तसेच स्नेहल हेंद्रे मुंबई, उपनगरे व महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष तसेच कृष्ण नराळे पुणे, नंदा गुरव, वृषाली देशपांडे, अलका क्षीरसागर, माधुरी गुजराती, हिरा पवार, नंदा नगरकर इत्यादी सर्व महीला युवा आणि ज्येष्ठ नागरीक आदी उपस्थित होते.

यात अ‍ॅड. अशपाक मुलाणी यांनी रमेश सुरवसे पाटील यांची लिखीत गुन्हेगारी विराेधात काम करण्यासाठी लिहलेली शपथ उभे राहून घेतली यावेऴी नवीन नियुक्ती पञ व आयडी वाटप करून व सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.