Entertainment News : अक्षय कुमारने यूट्यूबरच्या विरोधात केला ५०० कोटींची मानहानीची दावा

एमपीसी न्यूज : अक्षय कुमारने त्याच्याबद्दल फेक न्यूज पसरवल्याबद्दल ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एका यूट्यूबरने फेक व्हिडिओ बनवला. यात रिया चक्रवर्ती हिने भारतातून कॅनडाला पलायन केल्याची बातमी दाखवण्यात आली. या खोट्या बातम्या तयार करण्यासंदर्भात याआधीच युट्यूबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या यूट्यूबरचं नाव राशिद सिद्दीकी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अक्षयचं नाव काही कारण नसताना घेतलं. एवढंच नाही तर त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचं नावही या प्रकरणाशी जोडलं. यासंदर्भात त्याला याआधीच अटक करण्यात आली होती.

राशिद त्याच्या यूट्यूब चॅनलवरून अनेक सेलिब्रिटींच्या खोट्या बातम्या दाखवून लोकांची दिशाभूल करत होता. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये अक्षयच्या नावाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी केला आहे. सिद्दिकीने आपल्या एका रिपोर्टमध्ये दाखवलं होतं की, सुशांतला ‘एम.एस. धोनी’ हा सिनेमा मिळाला, त्यामुळे अक्षय नाराज होता.

एवढंच नाही तर त्याने आपल्या रिपोर्टमध्ये अक्षयवर आरोप करत म्हटलं की त्याने आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांशी गुप्त बैठक घेतली होती. सिद्दीकीने अक्षय कुमारचं नाव सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीशीही जोडलं. रियाला कॅनडाला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांमध्ये अक्षय कुमार असल्याचंही या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आलं आहे.

अहवालात असंही म्हटले आहे की आरोपीने यापूर्वी सुशांतच्या मृत्यूबद्दल पोस्ट केलं होतं. ती पोस्ट बऱ्याच लोकांनी पाहिली. यानंतर तो याच धाटणीनीचे अनेक पोस्ट शेअर करत राहिला. सप्टेंबरपर्यंत त्या जवळपास ६.५ लाख रुपये मिळाले. एवढंच नाही तर आरोपीचे यूट्यूब सबस्क्राइबरही झपाट्याने वाढले. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्या यूट्यूब अकाउंटवर २ लाख सबस्क्राइबर होते. मात्र यानंतर फेक व्हिडिओजमुळे त्याचे सबस्क्राइबर ३.७० लाखांपर्यंत पोहोचले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.