Akshay kumar supports Mumbai Police : ‘खिलाडी’ अक्षयची मुंबई पोलिसांना मदत

अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं (Fitness Health Tracking Device) वाटप केलं आहे

एमपीसी न्यूज – या करोना काळात अनेक स्टार्स आपापल्या परीने समाजातील विविध घटकांना मदत करत आहेत. अभिनेता सोनू सूदने केलेले काम तर सगळ्यांनीच गौरवलेले आहे. त्याच्या प्रमाणेच ‘खिलाडी’ अक्षय कुमार देखील समाजकार्यातही सक्रियपणे सहभाग घेत असतो.

अनेक वेळा अडीअडचणीत सापडलेल्या नागरिकांना तो मदत करत असतो. नुकतंच अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं (Fitness Health Tracking Device) वाटप केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कार्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयचे आभार मानले आहेत.

नाशिक पोलिसांनंतर अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं वाटप केलं. या डिवाइसमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजनची क्षमता, हृदयाचे ठोके हे तपासता येणार आहे. त्यामुळे त्याचं हे कार्य पाहून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अक्षयचं कौतुक करत त्याचे आभार मानले आहेत.

आपल्या वेगळ्या चित्रपटांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला अक्षय विविध माध्यमातून गरजूंची देखील मदत करत आहे. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यांसाठी त्यांनादेखील मदत करत आहे. त्यामुळे अक्षय कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तो ‘सूर्यवंशी’, ‘बेलबॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.