Vadgaon Maval News : जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत अक्षय तुपे प्रथम

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्हास्तरीय पुणे जिल्हा परिषदेकडून चित्रकला, निबंध, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील सामान्य ज्ञान स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कडधेचा विद्यार्थी अक्षय लहु तुपे याने प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच जिल्हा परिषद शाळा टाकवे खुर्द आणि साळुंब्रे या शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धांमध्ये नेत्रदिपक यश संपादन करून मावळ तालुक्याचा नावलौकिक वाढवल्या बद्दल पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, सामान्यज्ञान अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  सदर स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले .

सामान्य  ज्ञान – ( मोठा गट ) – अक्षय लहु तुपे – प्रथम – जिप शाळा कडधे

चित्रकला – ( मोठा गट ) – पल्लवी संतोष ढमाले – द्वितीय – जिप शाळा टाकवे खु.

प्रश्नमंजूषा – ( लहान गट ) – धनश्री कृष्णा हवालदार – द्वितीय – जिप शाळा साळुंब्रे.

तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले. असे नेत्रदिपक यश संपादन करून मावळ तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास पंचायत समिती मावळचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम, कोंडिवडेचे सरपंच लक्ष्मण तळावडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे,विस्तार अधिकारी राजश्री सटवे, रजनी माळी, सुनिल माकर, सर्व केंद्रप्रमुख, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यांनाही श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले.  तसेच तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद शाळा कान्हेच्या मुख्याध्यापिका शोभा वहिले यांना अभिनंदनपत्र व शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु.अक्षय तुपे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतात मिळविलेल्या यशामध्ये त्याचा नियमित वर्तमानपत्र बातम्या, प्रश्नपेढी , सोशल मिडिया वरून चालू घडामोडी, वाचन सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन वर्गातील सहअध्यायी विद्या सोबत अभ्यास  सदर यशामधील महत्वाचे वाटेकरी असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर प्रश्नमंजूषा लहान गटात द्वितीय क्रमांक मिळवणारी कु. धनश्री हवलदार व चित्रकला स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक मिळवणारी कु पल्लवी ढमाले या दोन्ही  विद्यार्थिनीने शिक्षकांचे मार्गदर्शन व नियमित वाचन सराव यामुळे यश संपादन करता आले असे मनोगतात सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यातील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषयतज्ञ सुचिता भोई मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन टाकवे केंद्राचे केंद्रप्रमुख सचिन आंब्रुळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.