Akshaykumar Talks On Nepotism: ‘माझ्या मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत’…

'I have taught my children to be self-reliant' आई-वडिलांच्या ओळखीवर एखाद्या व्यक्तीस संघर्ष केल्याशिवाय संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीच्या आधारावर दीर्घकाळ टिकता येत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील.

एमपीसी न्यूज- असं म्हटलं जातं की अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा बॉलिवूडमध्ये ‘आउटसायडर’ होता. त्यामुळे त्याला येथील घराणेशाहीला टक्कर द्यावी लागली. त्यात त्याची घुसमट झाली आणि त्याला त्याचा प्रचंड त्रास झाला. त्यामुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात मोठा गदारोळ होत आहे. स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. अनेक नामांकित कलाकार या मक्तेदारीचा विरोध करत आहेत.

अभिनेता अक्षय कुमार याने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही असं त्याने सांगितलं आहे. अक्षय़कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल या दोघांनीही आपापल्या कारकीर्दीची योग्य आखणी केली आहे.

सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल यांची मुलगी असलेल्या ट्विंकलने त्या मानाने कमी चित्रपटात काम केले. सध्या ती तिच्या लेखनात बिझी आहे. आणि अक्षयने तर शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे त्याच्या या बोलण्यामागे खूप अर्थ आहे.

‘रिपब्लिक भारत’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने घराणेशाहीवर भाष्य केलं. तो म्हणाला, ‘घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबीयांना काम देण्यापासून थांबवू शकत नाही.

आई-वडिलांच्या ओळखीवर एखाद्या व्यक्तीस संघर्ष केल्याशिवाय संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीच्या आधारावर दीर्घकाळ टिकता येत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील.

आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा फायदा मी घेऊ देणार नाही.

त्यांनी स्वत: ऑडिशन द्यावी आणि कामं मिळवावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशाचा खरा आनंद त्यांना मिळणार नाही’, अक्षय या मुलाखतीमुळे सध्या चर्चेत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.