Akudi : प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ‘जागते रहो’ उपक्रमाची सांगता

एमपीसी न्यूज – उन्हाळ्याची शालेय सुट्टी सुरू झाली की शहरातील कामगार, नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने बाहेरगावी जात असतो. ह्याच काळात चोऱ्या व घरफोड्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्याकरिता गेल्या १८ वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक पोलीस मित्र शहर व उपनगर परिसरामध्ये “जागते रहो” हा सामाजिक रात्रगस्त उपक्रम राबवित आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ‘जागते रहो’ या उपक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमामुळे रात्रीच्या सुमारास नागरिकांना सुरक्षा मदत सुद्धा मिळत आहे.त्याचप्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तींना सुद्धा वेळीच वैद्यकीय मदत उपलब्ध होत आहे.ह्या रात्रगस्त उपक्रमाचे शहरवासीयांनी सुद्धा स्वागत आणि कौतुक केले आहे.विशेषतः रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षितता प्राप्त झाली आहे.

  • दरवर्षी 1 मे पासून 10 जूनपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरक्षा स्वयंसेवक पोलीस मित्र पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे समवेत रात्रगस्त उपक्रम राबवित आहेत. ह्या वर्षी तीन दुचाकी अपघातग्रस्त व्यक्तींना स्वयंसेवकांनी तातडीचे वैद्यकीय प्रथोमोपचार उपलब्ध करून दिले तसेच वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांना त्याबाबत सूचितही केले. आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरातही रात्री उशिरापर्यंत रेल्वे प्रवाशांना सुरक्षाविषयक मदत करण्यात आली.

या उपक्रमास समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या समवेत सतत 40 दिवस रात्रगस्त उपक्रमासाठी विभागप्रमुख म्हणून विजय मुनोत, अर्चना घाळी दाभोळकर,संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, तेजस सापरिया,बाबासाहेब घाळी, अमोल कानु, अमित डांगे,अजय घाडी,नितीन मांडवे,संदीप सकपाळ,गोपाळ बिरारी,मंगेश घाग,सतीश मांडवे,समीर चिले,अँड.विद्या शिंदे,गौरी सरोदे, विभावरी इंगळे,जयेंद्र मकवाना,मनोज ढाके,जयप्रकाश शिंदे,सतिश देशमुख,उद्धव कुंभार यांनी काम पाहिले.

_MPC_DIR_MPU_II
  • ह्या उपक्रमास विशेष मार्गदर्शन निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, निगडी डी बी चे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे यांनी केले.

सांगता समारंभास पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे म्हणाले,” निगडी प्राधिकरण तसेच शहर उपनगर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीचा आलेखही वाढीस लागत आहे.रात्रीच्या सुमारास गस्त उपक्रमामुळे गुन्हेगारीसही आळा बसलेला दिसून आला आहे. पोलीस मित्र व स्वयंसेवक एसपीओ यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेबाबतची विश्वासहर्ता निर्माण झाली आहे.ह्या पुढेही पोलीस मित्र स्वयंसेवकांची विविध सामाजिक उपक्रमासाठी नक्कीच मदत घेतली जाईल.”

सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे म्हणाले,” वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार रात्रीच्या बंदोबस्त काळात रहिवासी परिसरासोबत निर्जन तसेच मोकळ्या जागेतही गस्त उपक्रम राबविला गेला. रात्री ११.०० च्या सुमारास प्रमुख चौकांमध्ये विशेष सुरक्षा मोहीम पोलिस मित्रांच्या मदतीने राबविली गेली त्यामुळे ह्यावर्षी गुन्हेगारी प्रवृत्तीनां मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश मिळाले. रात्रीच्या सुमारास पोलीस मित्र स्वयंसेवकांनी केलेले काम नक्कीच कौतुकस्पद आहे.”

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. निगडी समिती विभाग प्रमुख विशाल शेवाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.