Akurdi : बँकेच्या वसुली एजंटची कामगाराकडून 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेच्या वसुली (Akurdi) एजंटकडे काम करणा-या कामगाराने 11 लाख 25 हजारांची फसवणूक केली. ही घटना सन 2018 पासून 16 ऑगस्ट 2022 या कालावधीत जय गणेश व्हिजन आकुर्डी आणि वेळे, ता. वाई, सातारा येथे घडली.

संतोष लक्ष्मण काशीद (वय 47, रा. संभाजीनगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र हनुमंत पवार (वय 41, रा. वेळे, ता. वाई, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC Independence Day : महापालिकेने दिलेल्या ध्वजारोहणाच्या मानाने दिव्यांग बांधव भारावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विविध बँकेचे वसुली एजंट म्हणून काम करतात. त्यांच्याकडे वसुली कामासाठी आरोपी महेंद्र हा काम करत होता. फिर्यादी यांच्या सांगण्यावरून महेंद्रने विविध बँकांची 11 लाख 25 हजार रुपये किमतीची सहा वाहने सीझ करून त्याच्या गावी ठेवली. कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय ती वाहने महेंद्र याने परस्पर विकली. ते पैसे बँकेत जमा केले नाहीत. तसेच फिर्यादी यांनाही दिले नाहीत. फिर्यादी यांनी विचारणा केली असता महेंद्र याने वाहने परत देणार नाही, असे म्हणत भांडण (Akurdi) करून शिवीगाळ केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.