Akurdi : रस्त्यावर राडारोडा टाकणा-याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल

महापालिका आरोग्य विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील रेल्वेलाईनजवळील मोकळ्या जागेत राडारोडा टाकणा-या ट्रॅक्टर चालकाकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. राडारोडा उचलून ट्रॅक्टरमध्ये भरुन घेतला. तसेच प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली.

निगडी, प्राधिकरण येथील स्वीट जंक्शन यांच्या दुकानात दुबार प्लॅस्टिक बॅगचा वापर केला जात होता. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणातील ओम स्वीट, श्रीजी रेस्टॉरंट या व्यावसायिकांकडे बंदी असलेले प्लॅस्टिक सापडले. त्या दोघांकडून प्रत्येकी पाच हजार असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 10 आणि 14 मधील दावणगिरी डोसा, चिंचवड स्टेशन येथील मयूर डायनिंग यांना देखील प्लॅस्टिक बॅग ठेवल्याबाबत पाच हजार रुपयांचा दंड, तसेच शाहूनगर येथील तळीमण डोसा यांच्याकडून देखील पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.