Akurdi : हटकले म्हणून तरुणावर काचेच्या बॉटलने जीव घेणे वार

एमपीसी न्यूज- रागाने का पाहतो म्हणून हटकले (Akurdi)असता तरुणाने दारूच्या काचेच्या बॉटल ने दुसऱ्या तरुणावर जीवघेणे वार केले आहेत. ही घटना रविवारी(दि.26) सहा वाजता आकुर्डी येथे घडली.

यावरून निगडी पोलिसानी धनशाम माणिक शिवरकर (वय 49) याला अटक केली आहे. याप्रकरणी शंकर बाबा पांडवे (वय 24 रा.आकुर्डी) यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे.

Railway : पुणे-लोणावळा दरम्यान प्रत्येक किलोमीटरवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (Akurdi)फिर्यादी व त्यांचे मित्र पुष्कर वाईन्स समोर दारू पीत बसले होते यावेळी आरोपी हा त्यांच्याकडे रागाने बघत जात होता फिर्यादी यांनी त्याला रागाने का बघतोस म्हणून हटकले याचा राग आल्याने आरोपीने तिथेच पडलेली काचेची बॉटल उचलून तुला संपवतोच म्हणत फिर्यादी च्या मानेवर डोक्यावर व चेहऱ्यावर वार करत जखमी केले. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.