Akurdi : चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो ट्रॅव्हलर गॅरेजवर आदळला ; चारजण जखमी

एमपीसी न्यूज- बसला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून एक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर एका गॅरेजवर धडकला. गॅरेजच्या शेजारीच असलेल्या टपरीवर उभे असलेले चारजण या घटनेत जखमी झाले. ही घटना आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास आकुर्डीच्या खंडोबामाळ चौकाजवळ जय गणेश व्हिजन येथे घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 

_MPC_DIR_MPU_II

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी टेम्पो ट्रॅव्हलर (एम एच 14  ए बी 3618) व एक बस चिंचवडकडून आकुर्डी खंडोबमाळ चौकाच्या दिशेने येत होते. त्यावेळी बसला चुकवण्याचा प्रयत्नात अंदाज न आल्यामुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून हा टेम्पो जवळच बंद असलेल्या एका गॅरेजला धडकला. या गॅरेजच्या शेजारीच असलेल्या पान टपरीवर उभे असलेले तीन जण आणि टपरी चालक हुलावळे असे चौघेजण या घटनेत जखमी झाले. गॅरेज समोर उभ्या असलेल्या दुचाकीचे देखील नुकसान झाले. टिळेकर यांचे हे गॅरेज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.