Chinchwad : काळभोरनगरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनचे पासवर्ड की पॅड, पर्च बिल, हार्डडिस्क आणि ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा तोडून एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याने केला. त्यामध्ये 50 हजार रूपयांचे नुकसान झाले. ही घटना काळभोरनगर येथे शुक्रवारी (दि.15) घडली.

याप्रकरणी दिनेश धोंडिराम शिर्के (वय 28, रा. शिवनगरी कॉलनी, दिघी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोरनगर येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनचे पासवर्ड की पॅड, पर्च बिल, हार्डडिस्क आणि सीसीटीव्ही कॅमेरा तोडून अज्ञात चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याला एटीएम फोडता आले नाही. मात्र, त्याने 50 हजार रूपयांचे नुकसान केले.

फौजदार कामठे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.