Akurdi: अज्ञात वाहनाच्या धडकेत भिकारी गंभीर जखमी

Akurdi: Beggar seriously injured in an unidentified vehicle collision मॅनेजरच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी वाहन चालक न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

एमपीसी न्यूज- आकुर्डी चौकात भीक मागत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये भीक मागणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 18 जून रोजी दुपारी घडली. याबाबत 23 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारशी खात्रीबाद भोसले (वय 45, रा. पारधी आळी, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ मॅनेजर खात्रीबाद भोसले (वय 55) हा 18 जून रोजी आकुर्डी चौकात भीक मागत होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली.

यामध्ये मॅनेजरच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी वाहन चालक न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.