Akurdi : महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – हिंगणघाट जळीतकांड, राज्यातील महिलांची असुरक्षितता वाढत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आज (मंगळवारी) आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका यावेळी भाजपने केली.

या आंदोलनात महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर राहुल जाधव, एकनाथ पवार, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अमित गोरखे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका शैलजा मोरे, झामाबाई बारणे, सीमा सावळे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, अश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे, सोनाली गव्हाणे, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, आरती चोंधे, प्रियंका बारसे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, राजेश पिल्ले, अमोल थोरात, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी विविध घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. हिंगणघाट जळीतकांड घटनेचा निषेध केला. महाविकासआघाडी सरकार हे अनैसर्गिकरित्या स्थापन झाल्याचा आरोप करत या सरकारला भाजप खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, राज्यात लागू झालेली कर्जमाफी ही फसवी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकारने केले आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. “फसवे सरकार फसवी कर्ज माफी”, “यह भारत कि नारी है, फुल नही चिंगारी है” तसेच “महास्थगिती सरकारचा धिक्कार असो ” अशा घोषणा देत महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.