Akurdi : प्रजासत्ताक दिनानिमित्त गावडे ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून गावडे ग्रुपच्या वतीने आकुर्डी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे आठवे वर्ष आहे.

रविवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 यावेळेत आकुर्डी येथील गावडे बिझनेस सेंटर, तुळजाई माता मंदिराजवळ हे शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी डी वाय पाटील ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गावडे ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  9881142458 व  9881234381 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.