BNR-HDR-TOP-Mobile

Akurdi : पुणे-मुंबई महामार्गावरील दुकान फोडले

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी येथील एका दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली.

हार्दिक शैलेश जानी (वय 35, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश यांचे जुना पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ज्योती सेल्स अँड सर्व्हिस सेंटर हे दुकान आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर अर्धवट उचकटून त्यावाटे दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेली 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.