Akurdi : अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

Corona infiltration in Upper Pimpri Chinchwad tehsil office; Two employees positive: कार्यालयातील 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह

एमपीसीन्यूज : आकुर्डी येथील अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात येताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.

आकुर्डी रेल्वे स्थानकजवळ अप्पर पिंपरी चिंचवड कार्यालय आहे. या कार्यालयात विविध शासकीय कामासाठी नागरिक तसेच विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ असते.

या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांसह शिपायाचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या पैकी एक कर्मचारी पिंपळे गुरव तर दुसरा कर्मचारी रहाटणी येथून कामाला येत होते.

सोमवारी (दि. 13 ) या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कार्यालयातील सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर एका शिपायाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अप्पर पिंपरी चिंचवड कार्यालयाचे कामकाज सुरु ठवण्यात आले आहे.

कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरात मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून या कार्यालयातील तहसिदारांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या मदतीसाठी राबत होते. बेघर तसेच स्थलांतरित मजूर व विविध नागरिकांना या कार्यालयाच्या माध्यमातून जेवण, जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली होती.

शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधांकरक आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. गीता गायकवाड – तहसीलदार, अप्पर पिंपरी चिंचवड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.