Akurdi: कोरोनामुळे औषधनिर्माण विश्वात परिवर्तन होईल- सचिन इटकर

Akurdi: Corona will transform the pharmaceutical world says Sachin Itkar इटकर यांनी अर्थसंकल्पीय तरतूदीविषयी अंदाज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निग, रोबोटिक्स यांच्या भूमिका इत्यादी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे सर्व जगाचे जीवनचक्र थांबले आहे. कोरोनामुळे औषधनिर्माण विश्वात मोठे परिवर्तन होणार आहे, असा अंदाज औषधनिर्माण शास्त्रज्ञ सचिन इटकर यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डीच्या वतीने आयोजित एका वेबिनारमध्ये इटकर बोलत होते‌. इटकर यांनी संसर्ग पश्चात काळामध्ये औषध निर्माण क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीविषयी माहिती दिली.

त्याचप्रमाणे त्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची जैविक- औषधनिर्माण उद्योगांमधील भूमिका, औषधनिर्माण क्षेत्राचे हेल्थ केअर क्षेत्रात होणारे रूपांतरण, येणाऱ्या काळातील या क्षेत्राविषयी विश्लेषणात्मक माहिती दिली.

इटकर यांनी अर्थसंकल्पीय तरतूदीविषयी अंदाज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निग, रोबोटिक्स यांच्या भूमिका इत्यादी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

हा लॉकडाऊनचा काळात प्रत्येकाने आपल्या क्षेत्राचा अधिक अभ्यास करावा, मिळालेल्या वेळेचा वापर वाचन चिंतन व मनन करण्याकरिता वापरून कोव्हिड पश्चात परिस्थितीकरीता स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार करावा असे, आवाहन सचिन इटकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.