Akurdi : कोयत्याने वार करून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या तरुणास चार जणांनी मारहाण करून लुटले. त्यानंतर त्याच्या मित्रास बोलावून दोघांवरही कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डी येथे शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री घडली.

स्वप्नील अशोक नाईकरे (वय 26, रा. लांडगे नगर, भोसरी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईकरे हे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आकुर्डी येथील बिना इंग्लीश मिडियम स्कूल येथून पायी चालले होते. ते लघुशंकेसाठी थांबले असता दुचाकीवरून चार चोरटे आले. त्यांनी नाईकरे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील मोबाईल व रोख अडीच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्यानंतर चोरट्यांना आणखी पैसे हवे असल्याने त्यांनी नाईकरे यांना पुन्हा फोन देऊन नाईकरे यांच्या मित्रास बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार सचिन बंदी हा मित्र आल्याने आरोपींनी नाईकरे आणि सचिन या दोघांवरही कोयत्याने वार केले. मात्र सचिन याची प्रकृती दांडगी असल्याने तो चोरट्यांच्या हातून निसटला. याबाबत अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.