Akurdi Crime News : रेल्वेखाली सापडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली.

मृत व्यक्तीची ओळख पटली नसून शवविच्छेदना नंतर मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्षे असून उंची पाच फूट, पाच इंच आहे. चेहरा गोल, अंगाने सडपातळ, रंग काळा सावळा, नाक बसके, निळे बनियन, निळी जीन्स पॅन्ट घातलेली आहे. वरील वर्णनाच्या इसमाबद्दल माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.