Akurdi Crime News : उपचारासाठी आलेल्या व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीला चाकू आणि पिस्टलचा धाक दाखवून लॅपटॉप आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री पावणे सात वाजता आकुर्डी येथील संभाजी चौकात घडली.

तमीम अल्लाबक्ष अन्सारी (वय 40, रा. चिखली) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत बुधवारी सायंकाळी आकुर्डीतील संभाजी चौकात असलेल्या पर्ल डेंटल क्लिनिकमध्ये उपचारासाठी आले होते. क्लिनिकमधून घरी जाताना अन्सारी आणि त्यांच्या दोन मुलांसोबत रस्त्याच्या बाजूला पत्नीची वाट पाहत थांबले होते.

त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील एकाने चाकू दाखवला, तर दुस-याने पिस्टल दाखवून अन्सारी यांना धमकी दिली. अन्सारी यांच्याकडून लॅपटॉप आणि रोख रक्कम असा 14 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.