Akurdi Crime News : हॉटेलमध्ये कोंडून ठेवत पत्नीवर बलात्कार;पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सासरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने पत्नीला आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. सहा दिवस हॉटेलच्या एका खोलीत कोंडून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय विवाहित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 25) फिर्याद दिली. त्यानुसार 29 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये 11 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत घडला. आरोपी आणि फिर्यादी महिला हे पती-पत्नी आहेत. ते मागील काही दिवसांपासून एकमेकांपासून विभक्त राहत आहेत.

10 फेब्रुवारी रोजी आरोपीने महिलेला फोन केला. ‘मी तुला माझ्या सोबत घरी घेऊन जाणार आहे’ असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिला आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये 11 फेब्रुवारी रोजी बोलावले. हॉटेलमधील एका खोलीत महिलेला कोंडून ठेऊन तिच्यावर सहा दिवसांपर्यंत वारंवार बलात्कार केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.