Akurdi News : आकुर्डीतील डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : आकुर्डी स्थित डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारा शहरी विभाग व्यावसायिक श्रेणी मधील (Akurdi News) यावर्षीचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिनांक 26 जानेवारी रोजी प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असून विद्यापीठाच्या स्थापना दिनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहे. सदर पुरस्काराच्या घोषणेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एक वेळ शिक्कामोर्तब झाले असून हा पुरस्कार म्हणजे महाविद्यालयाच्या सर्व भागधारकांच्या योगदान तथा परिश्रमाचे कौतुक होय असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व 2019 च्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराचे मानकरी डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले आहे.

डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय राज्यातील एक नावाजलेले महाविद्यालय असून या महाविद्यालयाला एनबीएचे मानांकन, सी आय आय या राष्ट्रीय संस्थेचे प्लॅटिनम मानांकन प्राप्त आहे.

Pune : दिव्यांग-ज्येष्ठांच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे यांचा आंदोलनात सहभाग

आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब, विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम, सतत 90% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी, माजी विद्यार्थ्यांचे नियमित मार्गदर्शन, सामाजिक उपक्रमामधील सक्रिय सहभाग, अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन इत्यादी अभिनव गोष्टींमुळे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विशेष प्राधान्य श्रेणीमध्ये असते.

महाविद्यालयाच्या या यशासाठी आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष  सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील व संकुल संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी सर्व भागधारकांचे विशेषत: प्राध्यापक,  प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.