Akurdi : पवना नदीत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – पवना नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.

मृत इसमाचे अंदाजे वय 30 आहे. राखाडी पॅन्ट आणि निळसर रंगाचा टी शर्ट घातला आहे. हा इसम एक ते दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फायरमन लक्ष्मण होवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास पवना नदीपात्रात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ही कामगिरी वैभव शिंगोटे, अक्षय देशमुख, सचिन पोटे, शुभम हरणे, निखिल गोगावले, लक्षण होवाळे, विवेक खांदेवाल, रवींद्र अहिरे, प्रतीक गरड, चालक मोहिद्दीन तांबोळी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.