Akurdi : लोकलमधून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या लोकलमधून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 16) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वे पोलीस तुकाराम वालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या पुणे- लोणावळा लोकल आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ आली असता एक इसम लोकलमधून पडला. लोकलमधून पडलेल्या इसमाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

उंची पाच फूट सहा इंच, रंग काळा सावळा, अंगाने मजबूत असून उजव्या हातावर धनश्री हे नाव गोंदलेले आहे. अंगात राखाडी जर्किन, राखाडी चौकडी शर्ट आणि काळी जीन्स पॅन्ट घातलेली आहे. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मयत व्यक्तीच्या खिशात अमोल नायडू या नावाची पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वासीएम) रुग्णालयातील केस पेपरची पावती आहे. मात्र, त्यावर पत्ता नसल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचण येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.