Akurdi : लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोकल रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. ही घटना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ बीजलीनगर येथे घडली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावर लोकलच्या धडकेत रेल्वे रुळ ओलांडणा-या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

मयत व्यतीची अद्याप ओळख पटली नाही. वय अंदाजे 30 वर्ष असून रंग काळा आहे. उंची पाच फूट चार इंच, काळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट घातली आहे. हातावर ‘सुनीता’ असे कोरलेले आहे.
  • संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.