Akurdi : तहसील कार्यालयातील बंद पडलेली सातबारा फेरफार मशीन तात्काळ चालू करा

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन मागील 11 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागते. त्यात नागरिकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. त्यामुळे आकुर्डीतील तहसील कार्यालयातील फेरफार मशीन तात्काळ चालू करण्याची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात स्थायीचे अध्यक्ष मडिगेरी यांनी म्हटले आहे की, आकुर्डीतील तहसील कार्यालयातील फेरफार मशीन तब्बल 11 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागत आहे. त्याला वेळ लागत आहे.

या कार्यालयात एका व्यक्तीला दोन टोकन देण्यात येते. त्याकरिता तासन-तास रांगेमध्ये उभे रहावे लागते. तरीदेखील वेळेमध्ये सातबारा फेरफार भेटत नाही. त्याचा फायदा तेथील एजंट लोक घेतात. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आकुर्डीतील अप्पर तहसीलदार कार्यालयातील फेरफार मशीन तत्काळ चालू करावी अशी मागणी मडिगेरी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.