Akurdi : रात्रीच्या वेळी “श्वान पथक” तैनात करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुरामनगर आनंदनगर इंदिरानगर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त (Akurdi) करावा. रात्रीच्या वेळी ‘श्वान पथक’ कार्यान्वित करावे अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यामुळे येथील विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक कामगार यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोर जोरात भूकंतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांची निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले महिलांच्या अंगावर धावतात, त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेने विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्री पकडावीत. योग्य (Akurdi) त्या उपाययोजना कराव्यात. तसेच ही कुत्री रात्रीच्या वेळीच अधिक बाहेर पडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी “श्वान पकडण्याचे पथक”तैनात करावेत. प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही. तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
RTO : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका