Akurdi : अस्सल देशीपणा जपणारे आकुर्डी रेल्वेस्टेशन समोरील देशी कट्टा

एमपीसी न्यूज- असं म्हणतात दर बारा कोसावर भाषा बदलते. पण फक्त भाषाच नाही तर पेहराव, रीतीरिवाज आणि खाद्यसंस्कृतीदेखील बदलते. कोकणातील नारळाचा मुबलक वापर असलेले पदार्थ, मराठवाड्यातील झणझणीत, कोल्हापुरी तेजतर्रार, खमंग, व-हाडी चमचमीत आणि खानदेशी पदार्थांची तर काहीतरी वेगळीच गोडी असते. मात्र आपल्याला हे सगळे पदार्थ एका ठिकाणी मिळणं थोडं मुष्कील असतं. पण ख-या खवय्यांची ही आवड ओळखूनच आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या देशी कट्टा या हॉटेलमध्ये सर्वसमावेशकता जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

देशी कट्टा या हॉटेलने नावापासूनच आपले देशी पण पुरेपुर जपले आहे. हॉटेलमध्ये आत गेल्यावरच हे देशीपण लगेच लक्षात येते. लाकडी बाके, तट्ट्याचे डेकोरेशन असलेले दिवे, लाकडी शिड्या आणि चक्क पळस पानांच्या पत्रावळीची आठवण करुन देणारे सुंदरसे मेन्यू कार्ड. आणि मग त्या मेन्यूवर नजर टाकल्यावर तिथला देशीपणा हळूहळू जाणवायला लागतो. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जिश येथे आपल्या आवडीनुसार उपलब्ध आहेत. शिक्षणाने मूळच्या इंजिनिअर असलेल्या पण हॉटेल व्यवसायाची मनापासून आवड असल्याने हर्षदा योगेश जगताप यांनी हे हॉटेल तीन वर्षांपूर्वी आकुर्डी रेल्वे स्टेशनसमोर सुरु केले. सुरुवातील येथे आजूबाजूच्या कॉलेजमधील मुले येत असत. पण आता सर्व स्तरातील खवय्ये आवडीने भेट देतात.

सध्या येथे आषाढाच्या सेलिब्रेशनसाठी विविध डिश मिळतात. त्यात मटण हंडीवाला, मुर्ग मुस्सलम, चिकन काली मिर्च, तंदुरी चिकन, चिकन मलाई कबाब यासारख्या मांसाहारी आणि खास शाकाहारी लोकांसाठी सोया चाप, सोया नगेटस, दूध शेव भाजी, फ्राय शेव भाजी, खानदेशी, व-हाडी आणि पंजाबी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. याशिवाय शाकाहारी व मांसाहारी विविध प्रकारच्या थाळीदेखील येथे आहेत. शाकाहारी थाळी, पिठलं भाकरी, वरण बट्टी, खानदेशी शाकाहारी थाळी, पंजाबी शाकाहारी थाळी, भरीत थाळी येथे आहेत. तसेच मटण, स्पेशल मटण, चिकन, स्पेशल चिकन, फिश, अंडा थाळी आणि ऑर्डरनुसार खेकडा थाळी देखील उपलब्ध आहे. सध्या शाकाहारी प्रकारात येथे मिळणारे सोया चाप श्रावण पाळणा-यांसाठी देखील श्रावणात मांसाहाराची चव भागवणारे म्हणून नंतर उपयुक्त ठरणार आहेत. म्हणजे श्रावण आहे म्हणून तुम्हाला तुमच्या मनाला मुरड घालायला नको. तसेच येथे किलोमध्ये देखील स्टार्टर्स उपलब्ध आहेत.

मग आता आखाडाच्या मनसोक्त सेलिब्रेशनसाठी देशी कट्ट्याला भेट द्या आणि सगळ्या प्रकारच्या डिशचा मनमुराद आस्वाद घ्या.

देशी कट्टा
शॉप नं. 4, ला रिगालिया, सेक्टर नं. 26,
आकुर्डी रेल्वे स्टेशनसमोर, आकुर्डी, पुणे 44

संपर्कासाठी दूरध्वनी – 8605028900, 8999434364

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like