Akurdi : आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज –  आमदार व माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त बंटीसाहेब प्रेमी ग्रुप पुणे यांच्या उपस्थितीत आकुर्डीतील नचिकेत बालग्राम आश्रमात असणा-या अनाथ मुलांना वही व पेन वाटप करण्यात आले. 

सचिन पाटील यांनी मुलांना आरोग्यविषयक व शिक्षणाविषयक माहिती सांगून सध्याच्या युगामध्ये मुलांनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असा संदेश दिला.
यावेळी बंटीसाहेब प्रेमी ग्रुपचे अमर बरगुडे, अभिजित बिरंगे, राजेश पाटील, दीपक शिंदे, जितेश चौगुले, बाबा जाधव, हर्षद कांबळे. शशिकांत रोकडे, प्रतीक चौगुले, पांडुरंग पवार, विजय पाटील, प्रशांत पाटील, बाजीराव अदंबुसकर, एकनाथ पडवळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.