Akurdi: राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त होमगार्ड व सफाई कामगारांना अल्पोपहार वाटप

Akurdi: Distribution of snacks to home guards and cleaners on the occasion of Raj Thackeray's birthday कामगारांना राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी एमआयडीसी शाखेच्यावतीने दिघी, आकुर्डी व मोशी येथील कोरोना विलगीकरण कक्षाचे होमगार्ड व सफाई कामगारांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता.

शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीव धोक्यात घालून काम करणारे होमगार्ड व सफाई कामगार सुद्धा कोरोना योद्धा आहेत.

त्यामुळे या कामगारांना राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमावेळी मनसे शाखेचे कार्यकर्ते रवी कनूरकर, कृष्णा बिरुणगीकर, काशिनाथ खजुरकर, अप्पाशा केंगारे, निलेश खिलारे, चंद्रकांत दोडमनी, गणेश हरळेय्या, अर्जुन भालेराव ,परशुराम बिरुगीकर, राजू कनूरकर, गणेश द्वारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.