Akurdi : आकुर्डीत उद्या सखी दिवाळी  फेअर

एमपीसी न्यूज  – आकुर्डीतील जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या महिला विकासांतर्गत एसएसके सखी दिवाळी फेअरचे आयोजन केले आहे.

आकुर्डीत जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेत हे सखी दिवाळी फेअर होणार आहे. शुक्रवार दि. 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, यामध्ये एकूण 70 पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे. हस्तकला डिझाईनर साड्या व ड्रेसेस, ज्वेलरी, पर्सेस व बॅग, फ्रेम्स, स्वेटर्स, दिवाळीच्या विविध वस्तु, आकाशकंदिल व दिवे, घर सजावटीचे सामान, विविध भेटवस्तु, मसाले, दिवाळीचे खाद्यपदार्थ आदी स्टॉल नागरिकांना पहाता येणार आहे.  यामध्ये इतर सुविधा स्टॉल धारकांसाठी मोफत पुरविल्या जातात.  अधिक माहितीसाठी समाज सेवा केंद्राच्या समन्वयक स्वाती देशपांडे (7774012029)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.