Akurdi : डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलात संशोधन संमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – डॉ. डी वाय .पाटील शैक्षणिक संकुल,आकुर्डी पुणे, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी ‘संशोधन संमेलन 2019’ उत्साहात पार पडले. या संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

आकुर्डी येथे झालेल्या संमेलनाचे उदघाटन १३ जुलै पार पडले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वतीपूजनाने झाली. संस्थेचे संचालक कर्नल एस. के. जोशी, डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन व प्राचार्य डॉ. विजय वाढई, उपप्राचार्य डॉ. पी मालती आदी उपस्थित होते.

  • यावेळी डॉ. एस. एस. सरनोबत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. त्यानंतर संशोधन मेळावा 2019 च्या स्मरणिकेचे उदघाटन थोर संशोधक आणि डीआरडीओचे संचालक वी. वी. परळीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डी. आय. सी. चे प्रमुख प्रा. अरविंद डी शालिग्राम, साज टेस्ट प्लांट. प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जगताप, फोक्सवॅगन इंडिया चे देवेंद्र मराल, टाटा टेकनॉलॉजिएस, संतोष कौल यांच्या हस्ते झाले.संस्थेचे संचालक कर्नल एस. के. जोशी,  डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, प्राचार्य डॉ. विजय एम वाढई आदी उपस्थित होते.

आयएसटीई आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स यांच्या सहयोगाने ह्या संशोधन मेळाव्याचे आयोजन केले होते. विविध औद्योगिक क्षेत्रातील 250 हुन अधिक नामवंत प्रतिनिधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत व प्रज्ञावंत शिक्षकवृंद व विध्यार्थीगण या संशोधन मेळाव्यास उपस्थित होते.

  • विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, अनुभवी तज्ञ, अभियांत्रिकी विद्यार्थी व शिक्षक संशोधक यांच्यामध्ये संशोधनाची गोडी निर्माण करणे आणि परस्परांमध्ये ज्ञान,कौशल्य यांची देवाणघेवाण करणे हे या संशोधन मेळाव्याचे उद्दिष्ट होते. भारताची भावी पिढी संशोधनाकरिता प्रयोगशील बनवणेसाठी उचललेले महत्वाचे पाऊल म्हणजेच संशोधन मेळावा 2019.

थोर संशोधक आणि डीआरडीओ चे संचालक वी वी परळीकर ते म्हणाले, शैक्षणिक संस्था व औद्योगिक कंपन्यांनी सोबत संशोधन करण्याची गरज व्यक्त केली आणि नोकरीवर भर देण्यापेक्षा विदयार्थ्यांनी उद्योजक बनण्याची गरज व्यक्त केली. आणि समस्या सोडवण्यासाठी प्रथम वर्षांपासून विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषी,सरक्षण, उत्पादन क्षेत्रात संशोधनाची गरज व्यक्त केली.

  • सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डीआयसीचे प्रमुख प्रा. अरविंद डी शालिग्राम म्हणाले की, जोपर्यंत ज्ञानाची एकाद्या समाजपयोगी उत्पादनात रूपांतर होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही.तरुण विद्यार्थी भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यासाठी या तरुण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करून देशासमोरील आव्हानांसाठी तयार केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

साज टेस्ट प्लांट. प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जगताप यांनी सीओईपी मधून अभियांत्रिकी केल्यानंतर साज टेस्ट प्लांट. प्रा. लि ची जडणघण कशी झाली ते सांगितले आणि मेक इन् इंडिया चे ध्येय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे असे नमूद केले. फोक्सवॅगन इंडियाचे देवेंद्र मराल यांनी इंडस्ट्री 4.0 चे महत्व नमूद केले आणि इंडस्ट्री 4.0 पर्यंत औद्योगिक क्षेत्राचे परिवर्तन कसे झाले यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला.

  • संतोष कौल यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये रस घेतला पाहिजे, उत्सुकता जागवली पाहिजे आणि विविध क्षेत्रात संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. इंडस्ट्री 4.0 च्या दृष्टीने शिक्षण आणि उद्योग यांच्यातील सहयोग आणि विकासासाठी ही बैठक मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल. परस्पर पूरक फायद्याच्या उद्देशाने औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकत्रीत संवाद साधण्यासाठी हे संशोधन संमेलन महत्वाचे ठरेल.

हे संशोधन संमेलनाचे आयोजन करण्यास आकुर्डी येथील डॉ.डी वाय .पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सतेज डी. पाटील, यांची प्रेरणा लाभली. कर्नल एस के. जोशी, कॅम्पस संचालक, डॉ.डी वाय .पाटील शैक्षणिक संकुल,आकुर्डी ,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आणि डॉ. विजय एम वाढई, प्राचार्य, व डॉ सौ पी मालती उपप्राचार्य डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी, यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विजयकुमार एस. जत्ती, डॉ. संदीप एस. सरनोबत, डॉ. तपब्रता डे, संशोधन व विकास कक्षातील सदस्य यांनी हे संशोधन संमेलन २०१९ आयोजित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.