Pune News : आकुर्डी च्या डॉ. डी वाय पाटील औषधनिर्माण महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

एमपीसी न्यूज –   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 74 वा स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये आकुर्डीच्या डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीला (Pune News) शहरी विभाग व्यावसायिक श्रेणी मधील  शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य भिकूजी दादा इदाते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ संजीव सोनवणे हे  होते. या पुरस्कारा अंतर्गत पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व तीन लाखाचा धनादेश प्राचार्य डॉ निरज व्यवहारे व संकुल संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी संयुक्तपणे स्विकारला.

Chinchwad Bye-Election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 हजार जणांनी घेतले प्रशिक्षण

याविषयी बोलताना प्राचार्य डॉ नीरज व्यवहारे म्हणाले की,  हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा  शिक्कामोर्तब झाला असून (Pune News) यासाठी महाविद्यालयाच्या सर्व भागधारकांच्या योगदानामुळे शक्य झाला त्यामुळे प्राचार्य या नात्याने हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटला व आनंद झाला असे यांनी मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या या यशासाठी आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी सर्व भागधारकांचे विशेष करून प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.