Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डीतील डॉ. डी. वाय पाटील फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी ‘रासेयो’ अंतर्गत कोरोना महामारी निवारणासाठी मास्कची निर्मिती करून मोफत वाटप केले.

या जनजागृती उपक्रमात 75 विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी 50 विद्यार्थ्यांनी 500 कुटुंबाना जनजागृतीसाठी दत्तक घेतलेले आहे. सरकारच्या आदेशानुसार आरोग्य सेतू आणि ‘आय गॉट दिशा ॲप’ डाउनलोड करण्याचे आवाहन नागरीकांना करीत आहेत.

रासेयोच्या विद्यार्थ्यानी दत्तक घेतलेल्या कुटुंबियांना लॉकडाउनच्या काळात त्यांच्या समस्या जाऊन घेणे आणि त्यांचे निवारण करणे तसेच घरातील ज्येष्ठ नागरीकांना मानसिक आधार देणे हे सर्व कार्य प्रत्यक्ष घरी न जाता फोनद्वारे केले जात आहे.

विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून त्यावर विविध प्रकारच्या घोषणा लिहून जनजागृती करणे, रासेयो च्या अंतर्गत घरच्या घरी मास्क बनवणे व वाटप करणे, रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी रक्तदात्याची माहिती संकलित करणे, विविध व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडिया मार्फत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना डॉ. देवेंद्र शिरोडे व तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निरज व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.