Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात शहिदांचे स्मरण

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात स्थापत्य अभियांत्रिकी विभागांमध्ये हुतात्मा दिनानिमित्त शहिदांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी कॉलेजचे प्राचार्य विजय एम. वाढई, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, डॉ. संदीप शियेकर, डॉ. बी. एस. बालपगोल, कर्नल बी. के. भोंडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. वाढई म्हणाले, भारतातील सर्व जनता स्वातंत्र्यात जगत आहेत. ते फक्त स्वातंत्र्यवीरांच्या आणि राष्ट्रासाठी केलेल्या बलिदानामुळेच, त्यांच्या या बलिदानाचे स्मरण हे तरुण पिढीने सदैव लक्षात ठेवून देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहून राष्ट्र उन्नतीसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे. तसेच जागतिक जलदिनही साजरा केला. विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रश्नांवर पाणी सदैव जागृत आणि कार्यक्षम राहण्यास प्रवृत्त केले. तसेच नवनवीन संशोधनाने पाणी प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले.

डॉ. मोरे म्हणाले, आजच्या काळातील जगापुढील विविध पाणी विषयक प्रश्न नमूद करुन ते सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. संकुलाचे संचालक कर्नल एस. के. जोशी आणि संकुलाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन माने यांनी केले.आभार प्रा.मुकुंद चौगुले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like