Akurdi News : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजबाहेर एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

एमपीसी न्यूज  :   किरकोळ भांडणातून थेट एका विद्यार्थ्यानं दुसर्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केला आहे. आकुर्डी येथील डी.वाय. पाटील कॉलेजच्या बाहेरील रस्त्यावर एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केल्याने या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना काल शनिवारी, जानेवारी 21, 2023 रोजी रात्री 10.30 वा. ते 10.45 वा च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती देताना, शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस ठाणे म्हणाले की, काल संध्याकाळी डी वाय पाटील कॉलेज मध्ये वार्षिक स्नेह संमेलन ( गॅदरिंग) होते. त्यामुळे जास्त विद्यार्थी जमले होते. कॉलेज कॅम्पस च्या बाहेर रस्त्याच्या कडेला कट्ट्याजवळ हा चाकू हल्ला झाला आहे.

आरोपी यशराज शेलार, वय 21 ते 22 वर्षे, रा. आकुर्डी याने अनिकेत गोरे, वय 19 वर्षे, रा. चिंचवड याच्यावर चाकूने वार केले आहेत. त्यामुळे गोरे हा किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत माहिती मिळाल्यावर रावेत पोलीस अधिकारी व कर्मचारी तेथे गेले होते पण आरोपी तेथे सापडला नाही.

या घटने बद्दल, गवारे म्हणाले की, यशराज शेलारच्या प्रेयसीचा भाऊ हा अनिकेत गोरेचा मित्रा आहे. यशराजची प्रेयसी ही तेथे त्याच्याकडे आली होती. याबाबत अनिकेतने त्याच्या मित्राला म्हणजेच यशराजच्या प्रेयसीच्या भावाला कळवल्याने यशराजला राग आला व त्याने रागाच्या भरात अनिकेतवर चाकू हल्ला केला आहे. या प्रकरणी रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.