Akurdi : पिंपरीतील शारदा मुंडे यांचा व्हय मी सावित्रा व्याख्यानाच्या यशाबद्दल सत्कार

व्याख्यानाचे पाच हजार प्रयोग पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरीगावात राहणा-या शारदा मुंडे या जवळपास 30 वर्षाच्यापासून व्हय मी सावित्रा या जनजागृतीपर व्याख्यानाचा पाच हजार प्रयोगाचा टप्पा त्यांनी ओलांडला. त्याबद्दल द गुड पिपल फाऊंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

आकुर्डी दळवीनगर येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यात फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल खुणे, दत्तात्र जगताप, संतोष सोनावले, राजू शिरसठ आदी उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना शारदा मुंडे म्हणाल्या, दीड तासात सावित्री सागताना महिलांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न असतो. पुण्यातील प्रा. वृषाली रणधीर यांच्या मी सावित्रीबाई बोलतेय या कार्यक्रमांतून प्रेरणा घेत. सावित्रीची रचना केली. घरांघरात सावित्री पोहविण्याचे ध्येय उराशी बाळगून शेवटच्या श्वासांपर्यत हा प्रयोग करायचा आहे.

फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल खुणे म्हणाले की, ज्या महिलेने सावित्रीबाई साकारली. त्या महिलेचे कार्य घराघरांत पोहचविण्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शिरसठ यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली मुळीक यांनी केले. दत्तात्रय जगताप यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.