Akurdi: ‘दुधाला सरसकट 10 रुपये, दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्या’

Give a subsidy of Rs 10 per kg for milk and Rs 50 per kg for milk powder: 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलनाचा इशारा

शहर भाजपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. या संकटामुळे दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातून सावरण्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये तर दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात तहसीलदार गीता गायकवाड यांना आज दूध पिशवी व दूध पावडर भेट देवून निवेदन देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर संघटक अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सरचिटणीस, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणांमुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही.

महाराष्ट्रामध्ये 150 लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी 30 लाख लीटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. 90 लाख लिटर दूध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते.

30 लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त 1 लाख लिटर दूध खरेदी केले जाते. या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली.

आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध 20 ते 22 रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रुपये प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.