Akurdi : पीसीसीओईआरचा आगामी उत्कृष्ट महाविद्यालय 2019 म्हणून सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी-चिंचवड अभियंत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) सीईजीआरच्या वतीने ‘आऊटस्टँडिंग अपकमिंग इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्रा 2019’ (आगामी उत्कृष्ट अभियंत्रिकी महाविद्यालय 2019) हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘सेंटर फॉर एज्यूकेशन ग्रोथ अँड रिसर्च’ ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महावद्यालयांचा विश्लेषण अहवाल तयार करून उत्कृष्ट महाविद्यालयांना सन्मानित करते.

  • पीसीसीओईआरने स्थापनेपासून महाविद्यालयामध्ये शैक्षणिक, संशोधन आणि नवकल्पनांची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाची जोपासली आहे. यामुळेच पीसीसीओइआर महाविद्यालयामधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची गणना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रथम क्रमांकावर करण्यात येते. पीसीसीओइआर हे भारतातील एकमेव असे महाविद्यालय आहे की, जेथे पहिल्याच बॅचला 77 टक्के पेक्षा अधिक प्लेसमेंट मिळाली आहे.

संगणक अभियांत्रिकी विभागाची प्लेसमेंट तर शंभर टक्के आहे. पीसीसीओइआरने हा पुरस्कार अवघ्या पाच वर्षात मिळविला आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. महाविद्यालयाने आतापर्यंत 124 पेटंट्‌सची नोंदणी केली आहे. तर एकाच दिवसात 149 कॉपीराईट्‌स नोंदवून जागतिक विक्रम केला आहे.

  • या विक्रमाबद्दल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया या संस्थेने पीसीसीओइआरचा सन्मान केला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वार्षिक निकालात पीसीसीओइआरचा निकाल नेहमीच पहिल्या पाच महाविद्यालयात आहे.

महाविद्यालयाच्या विद्यापीठाच्या निकालाची गुणवत्ता विचारात घेऊन दिल्ली येथील “ग्लोबल एज्यूकेशन एक्सलन्स अॅवॉर्ड (जागतिक शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार) या संस्थेने पीसीसीओइआरला ‘‘द मोस्ट रिझल्ट ओरिएंटेड इंजिनिरिंग कॉलेज इन पुणे’’ (पुण्यातील सर्वोत्तम निकाल देणार अभियांत्रिकी महाविद्यालय) हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

  • या यशामध्ये संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. शीतलकुमार रवंदळे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, अशी माहिती लांडगे यांनी दिली.

पीसीसीओइआरने मिळविलेल्या पुरस्काराबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी प्राचार्य डॉ. हरीश तिवारी व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.