Akurdi Hospital News : रुग्णालयातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या आकुर्डी येथील रुग्णालयाची आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) पाहणी केली. या रुग्णालयातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, थॉमस नरोना, संजय खाबडे, अनिल शिंदे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे आदी उपस्थित होते.

आकुर्डी गावठाण येथे 100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 39 कोटी रुपये खर्च करून अद्यावत 5 मजली रुग्णालयाची इमारत उभारली जात आहे. याठिकाणी बसविण्यात येणा-या विविध उपकरणे तसेच इतर साहित्य आणि सुविधांची आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.