Akurdi : कवी रा.ना. पवार यांच्या पायांवर मस्तक ठेऊन मी कविता लिहतो – माधव पवार

एमपीसी न्यूज – माझे वडील सुप्रसिद्ध कवी रा.ना.पवार यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याची माझी पात्रता नाही; पण त्यांच्या पायांवर मस्तक ठेवण्याचा प्रयत्न मी कवितालेखनातून करतो आहे!” अशा भावना व्यक्त राज्यस्तरीय शब्दप्रतिभा पुरस्कारार्थी कविवर्य माधव पवार यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

शब्दधन काव्यमंचाच्या वतीने शनिवारी दि.१७ ऑगस्टला शब्दधन काव्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. बीना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष हाजी इक्बालखान अध्यक्षस्थानी होते.

  • यावेळी नारायण सुर्वे कला साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सावित्रीच्या लेकींचा मंच सचिव मीरा कंक, शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण,महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, वृक्ष प्राधिकरण समितीचे संभाजी बारणे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश वाकनीस, नंदकुमार मुरडे, कवी राजेंद्र वाघ, शोभा जोशी आदी उपस्थित होते.

कविवर्य माधव पवार (राज्यस्तरीय शब्दप्रतिभा पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील (पहिला गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार), निशिकांत गुमास्ते (अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार) तसेच देवेंद्र गावंडे, आत्माराम हारे, सोमनाथ टकले आणि समृद्धी सुर्वे यांना छावा काव्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या लेकीच्या लावणीतून वडील आणि मुलगी यांच्यातील हृद्य नात्याचे बंध उद्धृत करताच रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

  • प्रा. तुकाराम पाटील यांनी कवींनी गझललेखनाची कला आत्मसात करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. निशिकांत गुमास्ते यांनी स्वर्गीय अरविंद भुजबळ यांची कविता सादर केली. छावा काव्यपुरस्कार विजेत्या कवींच्या कवितांना श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली.

शब्दधनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांनी गझल लेखनाला उत्तेजन मिळावे, म्हणून शब्दधन काव्यमंचाच्या माध्यमातून पाच राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतील, असे जाहीर केले. यावेळी मधुश्री ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. सविता इंगळे आणि माधुरी विधाटे यांनी पुढाकारार्थींचा परिचय करून दिला.

  • संगीता झिंझुरके, अनिल दीक्षित, भाऊसाहेब गायकवाड, शरद शेजवळ, आय.के. शेख, फुलवती जगताप, जयश्री गुमास्ते, शामराव सरकाळे, अण्णा गुरव, मुरलीधर दळवी, निकिता महाबरे, शीला जगदाळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले.शब्दधनचे कार्याध्यक्ष प्रकाश घोरपडे यांच्या भैरवीगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.