Akurdi : आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता भारतीय अभियंत्यांमध्ये -डॉ. कार्ल पेरीन

केपीआयटी स्पार्कलचे पीसीसीओईमध्ये भव्य उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडत आहेत. बदल आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मनुष्य दररोज नाविण्य शोधत असतो. यामुळेच आज नविन वाटणारे तंत्रज्ञान अल्पावधीत कालबाह्य ठरते. असेच वेगवान बदल ऊर्जा व वाहतूक क्षेत्रात घडत आहेत. कुशल मनुष्यबळ, उपलब्ध साधन संपत्ती यामुळे या क्षेत्रातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता भारतीय अभियंत्यांमध्ये असल्याचे गौरवोद्‌गार अमेरिकेतील कोव्हेंट्री विद्यापीठाचे व इन्स्टिटयूट ऑफ फ्युचर ट्रान्सपोर्ट अँड सिटीजचे संचालक डॉ. कार्ल पेरीन यांनी येथे केले.

माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘केपीआयटी स्पार्कल 2019’ या नाविन्यपूर्ण कल्पना सादरीकरण स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. कार्ल पेरीन यांच्या हस्ते शनिवारी व रविवारी (दि.23) करण्यात आले. यावेळी कोव्हेंट्री विद्यापीठाचे मिशेल कॉनर्स, केपीआयटी कंपनीचे उपाध्यक्ष के.एन.एस.आचार्य, राहुल उपलप, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी व पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट डिन डॉ. शितलकुमार रवंदळे, समन्वयक प्रा. राहुल पाटील आदी उपस्थित होते.

  • यावेळी के.एन.एस.आचार्य म्हणाले की, केपीआयटी ऑटोमोटिव्ह आणि ऊर्जा (एनर्जी) क्षेत्रातील एक नामांकित कंपनी असून आतापर्यंत सुरक्षित वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहन संबंधित नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात केपीआयटीचे योगदान आहे. ‘ऊर्जा आणि गतीशिलतेचे भवितव्य’ (एनर्जी ॲन्ड मोबिलिटी फॉर फ्युचर) या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादरीकरणाची ही स्पर्धा आहे. यातून अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश समाजउपयोगी संशोधन करून ते समाजाच्या हितासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे हा आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 26 राज्यातून 22000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 2000 पेक्षा जास्त प्रकल्प प्राप्त झाले. त्यांचे अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील अनुभवी परीक्षकांनी परीक्षण करून त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडले आहेत. स्पर्धेतील उत्कृष्ठ प्रकल्पाला प्लॅटिनम दहा लाख रुपये, गोल्ड पाच लाख रुपये, सिल्वर दोन बक्षिसे अडीच लाख रुपये आणि एक कान्स एक लाख रुपये एवढ्या मोठ्या रक्कमेची स्पर्धेत बक्षिसे देणारी कदाचित देशातील केपीआयटी ही एकमेव कंपनी असेल. स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत.

  • विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, पीसीसीओई एक नामांकित अभियांत्रिकी शिक्षण देणारे, विद्यार्थ्यांचा तांत्रिक तसेच सर्वांगिण मौलिक विकास केंद्रबिंदू मानुन मूबलक प्रात्यक्षिकांसह व्यावसायिक शिक्षण देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. केपीआयटी स्पार्कल 2019 या स्पर्धेत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग, अटल इंनोव्हेशन मिशन, एआयसीटीई (AICTE), इंडिया डिजाईन कौन्सिल, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिजाईन, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) यांचा सहभाग आहे.

स्वागत करताना प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी सांगितले की, स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 24) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे (CSIR) संचालक डॉ. शेखर मांडे, निती आयोगाचे पद्मभूषण डॉ. वि. के. सारस्वत, अटल इंनोव्हेशन मिशनचे प्रमुख डॉ. उन्नत पंडित आणि एआयसीटीचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत. हि स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

  • पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन अमृता जोशी, आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.