Akurdi News : फायर मॉक ड्रिलच्या प्रशिक्षणामुळे बीना इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढणे झाले शक्य

एमपीसी न्यूज :  आकुर्डीतील पांढारकर नगरयेथील रिअल फ्रेग्रन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला मंगळवारी (Akurdi News) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या कारखान्याला लागूनच असलेल्या बीना इंग्लिश स्कूलमधील 500 विद्यार्थिनींची फायर मॉक ड्रिलच्या प्रशिक्षणामुळे सुखरूप आगीतून सुटका करण्यात आली. 

आकुर्डी येथील पांढरकरवस्ती हा दाट लोकवस्तीचा भाग असून येथे कंपन्या व घरे आहेत. दळवीनगर रेल्वे उड्डाणपुलालालागून हा परिसर आहे. पुलाच्या जवळ बैठी घरे आहेत. त्यानंतर बीना इंग्लिश मेडीयम स्कुल व त्याला लागूनच रिअल फ्रेग्रेन्सेस (पुणे) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे.(Akurdi News) या कपंनीत अगरबत्ती व धूप बनवतात. त्याच्या शेजारी वर्धमान ग्रुप ऑफ इंडिया ही कपंनी असून ती चहापत्ती व बेकरी प्रॉडक्ट्स तयार करते.

अंदाजे 10 वाजता आग रिअल फ्रेग्रेन्सेस (पुणे) प्रायव्हेट लिमिटेड या कपंनीत लागली व तेथून धुराचे लोट बाहेर निघू लागले. येथे अगरबती व धूप तयार करण्यासाठीची ज्वलनशील सामग्री असल्याने आग लवकर वाढली व ती शेजारच्या वर्धमान ग्रुप ऑफ इंडियामध्ये पसरली.

या आगीचा धूर शेजारील बीना इंग्लिश मीडियम शाळेतून दिसत होता. ही आग शाळेत देखील पसरण्याची भीती होती. त्यामुळे मुलांना लवकरात लवकर शाळेतून बाहेर काढण्याची गरज होती.

Pune Metro : भुयारी मार्गातून मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत

शाळेच्या मुख्याध्यापिका समीना मोमीन म्हणाल्या की, “आमच्या शाळेत सकाळच्या सत्रात एल.के.जी ते 11 पर्यंतचे 500 विद्यार्थिनी शिकतात. त्यांचे वर्ग सकाळी  7.30 वा ते दुपारी 12.30 पर्यंत असतात. सकाळी 10.15 वा जेवणाची सुट्टी असल्याने मुले वर्गाबाहेर आवारात होती. त्यावेळेस शेजारील कंपनीमधून धुराचे लोट बाहेर येत असताना दिसले. आग मोठी असल्याने शाळेत पसरण्याची भीत होती. शाळेतील 45 स्टाफ मेंबर्सनी सर्व विद्यार्थिनींना सुखरूप 5 मिनिटात शाळेबाहेर काढले.”

याविषयी बोलताना, मोमीन म्हणाल्या की, “कोरोना काळात शाळेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन  विभागाच्या वतीने मॉक ड्रिल  घेण्यात आले होते. त्यामध्ये आग लागल्यानंतर काय उपाय करायचे त्याविषयी स्टाफ व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.(Akurdi News) आग लागल्याचे कळल्यानंतर घाबरून न जाता शांत राहणे. शिस्तबद्ध रित्या सर्व मुलांना शाळेबाहेर कसे काढायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेने स्वतः एक फायर मॉक ड्रिल या वर्षी दिवाळी च्या पूर्वी घेतले होते. त्यामध्ये देखील आग लागल्या नंतर काय उपाय करायचे त्याविषयी स्टाफ व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.”

त्या पुढे म्हणाल्या की, “या दोन्ही मॉक ड्रिलमुळे आज स्टाफ व मुलांना खूप जास्त फायदा झाला. 8, 9 आणि 10 वीतील मोठ्या मुलींनी एल.के.जी व इतर लहान मुलींना शाळे बाहेर आणले. 10 ते 12 क्लासरूम मधील सर्व मुली 5 मिनिटात शाळे बाहेर रोडवर आले. शिक्षकांनी बाहेर रोडवरील वाहतूक थांबवून 10 मिनिटात विद्यार्थिनींना रोडच्या पलीकडे नेले. शिक्षक व स्टाफ मेंबर्सनी सर्व खाजगी स्कूल बसचालकांना फोन करून कळवले की त्यांनी येऊन विद्यार्थ्यांना घेऊन जावे व घरी सोडावे. तसेच शिक्षक व स्टाफ मेंबर्सनी पालकांच्या व्हाट्सअँप ग्रुप वर मेसेज पाठवले की पालकांनी शाळेत येऊन त्यांच्या मुलींना घरी घेऊन जावे. चिखली, रावेत, खराळवाडी, पिंपरी, चिंचवड आशा लांब परिसरातून विद्यार्थी शाळेत येतात.”

मुलांचे एलकेजी ते दहावी पर्यंतचे वर्ग दुपारी 12.30 वा ते 5.30 वा पर्यंत असतात. या मुलांना आज सुट्टी देण्यात आली आहे.  (Akurdi News) शिक्षक व स्टाफ मेंबर्सनी पालकांच्या व्हाट्सअँप ग्रुप वर याबाबतचे मेसेज पाठवले आहेत. आग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील स्टेजचा 30 फूट बाय 15 फूट चा पडदा काढण्यात आला होता.

बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे विश्वस्त आझम खान म्हणाले की, “सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी तातडीने सुखरूप बाहेर काढले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागामुळे आग आमच्या शाळेमध्ये पसरू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.