Akurdi: जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने CM निधीस मदत

akurdi: maratha seva sangh nagari sahkari patsanstha donate 51 thousand to cm relief fund मराठा सेवा संघाच्या आकुर्डी, पिंपरी-चिंचवड पुणे येथील कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.

एमपीसी न्यूज- जिजाऊ स्मृतीदिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे सचिव व मराठा सेवा संघाचे केरळ राज्य प्रभारी प्रकाश जाधव यांच्या हस्ते ‘कोविड’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मावळ प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या 346 व्या स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या आकुर्डी, पिंपरी-चिंचवड पुणे येथील कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमासाठी अॅड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, सचिव वाल्मिक माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नकुल भोईर, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर कार्याध्यक्षा सुनिता शिंदे, डॉ. प्रकाश चव्हाण, पतसंस्थेचे व्यवस्थापक पोपट शिर्के व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस मावळ विभागीय प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.