Akurdi: जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी!

एमपीसी न्यूज – आकुर्डी खंडोबा माळ ते रामनगर चौक रस्तावरील जलवाहिनी सोमवारी (दि. 9) फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे पाणी कपात असताना दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. सातत्याने जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आकुर्डी खंडोबा माळ ते रामनगर चौक रस्त्यावरील जलवाहिनी सोमवारी फुटली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. लाखो लीटर पाणी जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेले. तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांची एकच धावपळ उडाली.

प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, अशा चुकीच्या पाणी पुरवठा नियमनामुळे शहरात जागोजागी पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे जलवाहिण्या फुटण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. गेल्या आठवड्याभरात पिंपरी-चिंचवड शहरात 14 पेक्षा जास्त ठिकाणी जलवाहिन्या फुटून पाणी गळती झालेली आहे.

अशा पद्धतीने जलवाहिण्याची तपासणी न करता, तसेच पाणी दबाव यंत्रणेची पाहणी न करता पुरवठा करणे अयोग्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीण्यांची तांत्रिक बाब न तपासता अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.